मुंबई ( वृत्तसंस्था ) – उच्च व तंत्रशिक्षण विभाग, माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करिअर कट्टा कार्यक्रमात प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स , असिस्टंट कमांडंट परीक्षेची व इतर स्पर्धा परीक्षेंची तयारी यावर ५,००० विद्यार्थ्यांना ७ मेरोजी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी केंद्रीय निमलष्करी दलातील सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल , केंद्रीय राखीव पोलीस दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल , सशस्त्र सीमा पोलीस दल यातील असिस्टंट कमांडंट या परीक्षेची तयारी कशा प्रकारे करावी याबद्दल मार्गदर्शन केले .असिस्टंट कमांडंट हे पद महत्त्वाचे आहे .केंद्रीय लोकसेवा आयोगाची सीएपीएफ ही परीक्षा देऊन राष्ट्राची सेवा हे साध्य आहे. या परीक्षेची वयोमर्यादा, शैक्षणिक व शारीरिक पात्रता , परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि त्यासाठी अभ्यासावयाची पुस्तके , मुलाखत याविषयी मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना सातत्याने कष्ट करण्याची तयारी हवी. स्पर्धा परीक्षा हे साधन असून अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे .स्पर्धा परीक्षेत परिश्रम, शिस्तबद्ध, सूत्रबद्ध , नियोजन पूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने करिअर करावे असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी केले .
असिस्टंट कमांडंट या पदाच्या माध्यमातून उत्तम , रचनात्मक , सर्वोच्च, दैदिप्यमान , यशस्वी करावे व राष्ट्राची सेवा करावी अशा शुभेच्छा प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी दिल्या. प्रास्ताविक समन्वयक प्रा.यशवंत शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती रंजना भोसले यांनी केले.करिअर कट्ट्याचे विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, प्राध्यापक व ५,००० विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.