जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जानकीनगरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने स्वयंपाक करणारा आचारी जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.
जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील जानकी नगरात बंशीलाल पांडे (वय 55 , रा. जानकी नगर ) गेल्या 20 वर्षांपासून आचारीचे काम करतात. 8 मार्च रोजी सायंकाळी कमर्शियल गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये बन्सीलाल पांडे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले बालकिसन गणेशलाल जोशी गंभीर जखमी झाले. जखमीस तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन अश्वजित घरडे, वाहन चालक नासिर अली शौकत अली, भिला कोळी, सोपान जाधव, नितीन बारी, तेजस जोशी, वाहन चालक युसुफ पटेल, निवांत इंगळे, संतोष पाटील, मोहन भाकरे यांच्यासह घटनास्थळी 2 बंब दाखल होते.