पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील ध्येय अकॅडमीचे संचालक व ध्येय न्यूज चॅनलचे संपादक संदीप महाजन आणि गो से हायस्कूलच्या शिक्षिका शीतल महाजन यांची कन्या कु वैष्णवी महाजन यांचे शिक्षण गो से हायस्कूल व एम एम कॉलेज येथे झाले . पुणे येथे फर्गुसन कॉलेजमध्ये गणित विषय घेऊन पीएचडी करण्याचा मानस पूर्ण केला .
तालुक्यातील लोहटार येथील मुळ रहीवाशी स्वातंत्र्य सैनीक स्व. दामोदर महाजन यांची नात कु.डॉ. वैष्णवी महाजन यांनी फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात (A+) पदवी , M.Sc (A+) , B.Ed (A++) यश प्राप्त केले गणित विषयात तिने J.J.T.U. येथुन Certain Investigations On Algebraic Structure Of Groups And Rings या विषायात संशोधन करून वयाच्या 26 वर्षी Ph.D. होण्याचा मान पटकावला. JJTU येथे लेखक हरीश भिमानी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. विनोद टिबडेवाल, आय.जी.सुरेंद्रकुमार गुप्ता, सी.आर.पी.एफ डी. आय.जी. नरेंद्रसिंह , खासदार नरेंद्र खिचड, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप शर्मा, डॉ. मधु गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थीत कु.डॉ. वैष्णवी यांना पि.एच.डी (मॅथ) पदवी प्रदान करण्यात आली कु.डॉ. वैष्णवी पाचोरा येथील शेठ एम. एम. सिनीअर कॉलेजला तिन वर्षापासुन गणित विभागप्रमुख म्हणुन कार्यभार सांभाळत आहे.