यावल( प्रतिनीधी) – सोमवार दिनांक 8 मार्चपासुन प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा, ता. यावल येथे कोरना लसीकरणला जि.प.सदस्य .प्रभाकर आप्पा सोणवणे यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात करण्यात आली. प्रा.आ.केंद्र हिंगोणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, डॉ.अभिषेक ठाकुर यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात घेतलेली मेहनत अतिशय स्तुत्य असुन परीसरातील नागरीकांतर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या हातुन अशीच रुग्णसेवा घडो असो असे स्तुतीसुमने उधळले. तसेच परीसरातील अपेक्षित नागरीकांनी मोठ्या संख्येने लसीकरण करुन घ्यावे जणेकरुन कोरोणा ला हद्दपार करता येईल असे आवाहन देखील प्रभाकरआप्पा सोणवने यांनी केले.

आजपासुन सुरु होणाऱ्या लसीकरणाकरीता वय वर्ष 60 पासुन वरील सर्व नागरीक तसेच 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिड नागरीक अपेक्षित असुन,सर्व अपेक्षितांना लसीकरण करण्यात येणार अाहे. रोज सुमारे 200 नागरीकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट प्रा.आ.केंद्रातर्फे योजन्यात आले असुन त्याकरीता आवश्यक सुसज्ज नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष, लसीकरणाच्या नंतर निरीक्षण कक्षाची सोय उप्लब्ध करुन दिली आहे.
कोरोना लस हि उत्तम असुन याचे कुठलेही दुष्परीनाम आजपर्यंत दिसुन आलेले नाहीत त्यामुळे हिंगोण्यासह परीसरातील अपेक्षित नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत लोकांनी कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन प्रभाकर आप्पा सोणवने यांनी केले आहे.
आज दिवसभरात हिंगोणा गावातील नागरिकांनी कोरोना लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद देत सुमारे 148 लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे.
सदरील लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन समयी रुग्ण कल्याण समितीते अध्यक्ष तथा जि.प.सदस्य मा.प्रभाकरआप्पा सोणवने, हिंगोण्याचे सरपंच सौ.रुक्साना तडवी, उपसरपंच भरत पाटिल, फैजपुर चे.उपनगराध्यक्ष राकेश जैन, माजी..पं.स.सदस्य जयराम तायडे,मा.सरपंच महेश राणे,ग्रा.प.सदस्य विष्णु महाजन, किशोर सावळे, सागर महाजन, पराग कुरकुरे, कपिल खाचने, उमेश भालेराव,भरत कोळी, शांताराम तायडे, सर्व ग्राम पंचायत सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, डॉ.अभिषेक ठाकुर, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अतुल वायकोळे, डॉ.तृप्ती चौधरी, आरोग्य सहाय्यक अशोक तायडे, आरोग्य सहाय्यिका नलिनी चौधरी, विलास महाजन, त्र्यंबक सावळे, अविणाश तायडे, आरोग्य सेविका कल्पना इंगळे, वैशाली तळेले, ममता मरपुले, कामिनी किनगे, ज्योती भवरे, पंकज चोपडे, कैलास कोळी, निलिमा महाजन, बाळु अडकमोल, फत्तु तडवी तसेच आशा वर्कर्स व परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







