जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील रायपूर येथील परप्रांतीय विवाहित तरुणाचे अपहरण झाले आहे. दोन जणांविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मूळ मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील भातखेडा, पानगर येथील रहिवासी भुषण जयराम तळेले हे कामानिमित्ताने पत्नीसह जळगाव तालुक्यातील रायपूर येथे वास्तव्यास आहेत. १७ एप्रिल रोजी भुषण तळेले घरातून बाहेर पडले, मात्र पुन्हा घरी परतले नाही. दोन महिन्यांपर्यंत त्याची प्रतिक्षा केली, मात्र ते घरी न आल्याने भुषण तळेले यांची पत्नी आशा तळेले यांनी ७ जून रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. कोणत्या तरी कारणावरुन भुषण तळेले यांना रायपूर येथील भिकन शामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी दोन जणांनी पळवून नेत त्यांचे अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद असून त्यानुसार विठ्ठल प्रेमसिंग परदेशी व भिकन शामसिंग परदेशी या दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अनिस शेख हे करीत आहेत.