जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथे काहीही कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी करणाऱ्यां चार जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद गावातील भवानी नगर हनुमान मंदीराजवळ रोहित अनिल रंधे (वय-२०) कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ६ जून रोजी दुपारी काहीही कारण नसतांना गल्लीत राहणारे शंकर प्रल्हाद जोहरे, प्रल्हाद जोहरे, जिजाबाई प्रल्हाद जोहरे आणि लक्ष्मी प्रल्हाद जोहरे यांनी रोहित रंधे याला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केले होते. शिवीगाळ करून आम्ही तुम्हाला पाहून घेवू अशी धमकी दिली. ७ जून रोजी रात्री रोहित रंधे यांच्या फिर्यादीवरून शंकर जोहरे, प्रल्हाद जोहरे, जिजाबाई जोहरे आणि लक्ष्मी जोहरे यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ मोहम्मद नूर खान पठाण करीत आहेत.