जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील ज्येष्ठ पत्रकार यांचा रिक्षा प्रवासादरम्यान अज्ञात तीन जणांनी १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आचार्य अत्रेनगर येथे ज्येष्ठ पत्रकार हेमंत शंकरराव काळुंखे (वय-६७) हे वास्तव्यास आहेत. ते ८ जून रोजी सकाळी हॉटेल त्रिमुर्ती परिसरातील तुकाराम श्रीपाद चौधरी कॉम्प्लेक्स परिसरात आले होते. दरम्यान पुन्हा घराकडे जाण्यासाठी रिक्षात बसले असता, रिक्षात काळुंखे यांच्याजवळ बसलेल्या तीन जणांनी काळुंखे यांच्या शर्टाच्या खिशातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. प्रकार लक्षात आल्यावर काळुंखे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन तीन जणाांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहेत.