भडगाव (प्रतिनिधी) – शहरातील खालची पेठ येथील रहिवाशी तरुण विवाहिता दुर्गा नरेश मालचे ही विवाहीता आपल्या दोन वर्षाच्या नयना नावाच्या मुलीसह दि.२ जुन रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रहात्या घरून बेपत्ता झाल्याने तिच्या नातेवाईकांनी भडगांव पोलिसात हरवल्याची नोंद दाखल केली आहे.
शहरातील खालची पेठ येथील रहिवाशी बळीराम हरचंद सोनवणे यांची पुतणी दुर्गा नरेश मालचे (वय- २८ वर्ष) ही विवाहीता आपल्या दोन वर्षाच्या नयना नावाच्या मुलीसह माहेरी जवखेडा ता. अमळनेर येथे जात आहे, असे सांगुन सोनवणे यांच्या घरून निघुन गेली आहे. ती अद्यापावेतो घरी परत आली नाही. तिचे काका व नातेवाईक यांनी आजपावेतो तिची शोधाशोध केली असता मिळून आली नाही. त्यामुळे बळीराम हरचंद सोनवणे यांच्या खबरीवरून भडगांव पोलिसात हरवल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ विजय जाधव हे करीत आहे.