प्रशासकीय अडचणी सोडवल्यावर उर्वरित देण्याची मुख्याधिकाऱ्याची ग्वाही
जामनेर ( प्रतिनीधी ) – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातून 8 टक्के निधि लाभार्थी यादी तयार करुन दिला जातो. परंतु यावर्षी हा निधि 5 टक्के वाटप करण्यात आला. दीव्यांग बांधवांनी नाराजी व्यक्त करत 8 टक्के निधी द्या अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याकडे केली आहे .
यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी सांगितले की अपंगांना दिला जाणारा निधी नगरपरिषद उत्पन्नातून दिला जातो नगरपरिषद उत्पन्न व वाढलेली लाभार्थ्यांची संख्या पाहता या निधीत कपात करण्यात आली असली तरी नगरपरिषदेच्या उत्पन्नानुसार राहिलेला फरक हा मार्च अखेरीस प्रशासकीय अडचणी सोडवून कसा देता येईल याचा विचार करून मार्ग काढू
यावेळी दिव्यांग बांधवांसोबत रवींद्र झाल्टे , प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप गायके यांनी प्रशासकीय अडचणीची माहिती देऊन हक्काचा निधी कायदेशीर मार्गाने कसा मिळवायचा याचा प्रयत्न केला जाईल तसे आश्वासन नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहे असेही सांगितले
जनशक्ती पक्षाचे प्रदीप गायके यांनी सांगितले की , आमदार बच्चू कडू यांनी स्वतंत्र अपंग मंत्रालय स्थापन करण्यात यावे अशी मागणी केली आहे वाटल्यास या मंत्रालयाचा कारभार मी सांभाळण्यास तयार आहे असेही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे अशी माहिती फिली निधीबद्दल आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले.