यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चुंचाळे गायरान गावात आदिवासीना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने आदिवासीमध्ये अस्वस्थता आहे. आमचे ही ‘घर’ होण्यासाठी थेट पंचायत समिती स्तरावर उपोषणाला सुरुवात केली समाजसेवक संजीव शिरसाठ, बिरम बारेला यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या उपोषणाला आ. लता सोनवणे यांच्या मध्यस्थीने गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
बिराम बारेला , संजीव शिरसाठ ( जिल्हा सरचिटणीस शेतकरी शेतमजूर पंचायत शाखा जळगाव) यांचे नेतृत्वाखाली १५० महिला व पुरुष ५ जुलैरोजी पंचायत समिती आवारात उपोषणाला बसले होते. आमदार लता सोनवणे यांनी गटविकास अधिकारी यांना घरकुलचा प्रश्न लवकर मार्गि लावा, अशी सूचना केली होती त्यानंतर यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे )याचे दालनात संजीव शिरसाठ, बिराम बारेला यांनी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी चिरमा बारेला, झिन्या बारेला, ललिता बारेला, गजऱ्या बारेला, शिल्या बारेला, गिना बारेला, नानबाई बारेला, चारली बारेला, भुरलीबाई बारेला, आमना बारेला, शामराव बारेला, चित्र्या बारेला, प्रेमसिंग बारेला, किशन बारेला, लखन बारेला, निरश्या बारेला, नकाराम बारेला, अर्जुन बारेला, सुनिल बारेला, नमसिंग बारेला यासह सर्व आदिवासी बंधु भगिनीं उपस्थित होते.
प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना लेखी निवेदन देण्यात आले. माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे यांचे मध्यस्थीने हे उपोषण तात्पुरते थांबविण्यात आले आहे.