जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून आज देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात ८७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आज जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात रुग्णांची संख्या अधिक आहे.
जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ-४०, अमळनेर-०५, चोपडा-०६, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-०९, मुक्ताईनगर-०४, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातून ०१ असे ८७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार १२७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.