जळगाव ( प्रतिनिधी ) – आरोपींना पकडून त्यांनी हिसकावलेले 8 गुन्ह्यातील दागिने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे हस्ते आज फिर्यादींना परत करण्यात आले .
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 चैन , रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 व औरंगाबाद येथील 1 अशा 8 चैन स्नॅचिंग गुन्ह्यांमधील आरोपींना पकडून त्यांच्याकडून हस्तगत केलेला हा मुद्देमाल होता या 2 चोरट्याकडून 139 ग्राम सोन्याचे 8 मंगळसूत्र जिल्हापेठ पोलिसांनी जप्त केले होते
फिर्यादी प्रतिभा काटदरे (रा प्रेमनगर ) यांचे 20 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, प्रमिला सोमाणी (रा – चैतन्य नगर) यांचे 20 ग्रामचे मंगलसूत्र, सुनीता पाटील ( रा श्रीनिवास कॉलोनी ) यांचे 10 ग्रॅमचे मंगळसूत्र , सुनीता कुलकर्णी ( रा गुरुकुल कॉलोनी ) यांचे 30 ग्रामचे मंगळसूत्र , माया निकम ( रा शिवराना नगर ) यांचे 12 ग्रामचे मंगळसूत्र असे 8 पैकी 5 फिर्यादीना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, कुमार चिंता यांचे हस्ते मुद्देमाल परत करण्यात आला.
पो नि रामदास वाकोडे, स पो नि महेंद्र वाघमारे, पो ना सलीम तडवी, विकास पहुरकर, योगेश साबळे, समाधान पाटील यांनी मेहनत घेऊन आरोपी संदीप सोनवणे ( 34 वर्ष रा – कामगार नगर सातपूर , नाशिक ) व सतीश चौधरी ( रा मालेगाव कलेक्टर पट्टा ) यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला होता . हे आरोपी आता जळगावच्या कारागृहात आहेत.
ओळख परेडमध्ये सर्व फिर्यादी यांनी या आरोपींना ओळखले आहे, सर्व फिर्यादी यांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले आहेत .