यावल (प्रतिनिधी) – यावल येथे तालुका राष्ट्रवादी कांग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभागच्या यावल शहर युवक अध्यक्ष पदावर नदीम रजा खाटीकची नियुक्ती करण्यात आली, सदर नियुक्ती राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भैय्यासाहेब रविन्द्र पाटील , माजी आमदार मनिषदादा जैन , राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभाऊ नाना पाटील (जि प सदस्य) अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मज़हर पठान राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकेशसर येवले , राष्ट्रवादी आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष एम .बी.तडवी सर , यावलचे माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ पाटील , माजी उपनगराध्यक्ष राकेशदादा कोलते,आमचे मित्र युवक तालुकाध्यक्ष देवकांत भाऊ पाटील , फैजपुर शहराध्यक्ष अन्वरभाऊ खाटीक व इतर नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.









