अमळनेर(प्रतिनिधी) – केंद्रसरकारच्या शेतकरीबाबतच्या धोरणाविरुद्ध शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून अमळनेर तालुक्यात राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, प्रहार, भिम आर्मी, आदिवासी एकता संघर्ष समिती आदी सह विविध संघटनेतर्फे अमळनेर बंद आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडे नऊ वाजेला शहरातील विजय मारुती जवळ सर्व कार्यकर्ते जमले त्यांनतर बंद रॅलीला सुरुवात झाली. शहरात बंद करण्याचे आवाहन करण्याकरीत रॅली काढण्यात आली. रॅलीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. “मोदी सरकार मुर्दाबाद, जय जवान-जय किसान,शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे,” आदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते. शहरांतून बंदचे आवाहन करून शेवटी अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ यांना राष्ट्रीय किसान मोर्चा व सर्व पक्षीय निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार अनिल पाटील यांनी भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध नोंदवला व जर मोदी सरकारने हा काळा कायदा रद्द नकेल्यास पुढे उग्र स्वरूपात आंदोलन केले जाण्याचा इशारा दिला.

या प्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे केंद्रीय उपाध्यक्ष शिवाजी पाटील, राज्यध्यक्ष चंद्रकांत जगदाळे , जिल्हाध्यक्ष प्रा विश्वास पाटील, रमेश पाटील , जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील , काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील , कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील , ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील , शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे बी के सूर्यवंशी , शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश पाटील , आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रा जयश्री साळुंखे, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव , भारती गाला, बन्सीलाल भागवत, इम्रान खाटीक ,प्रताप शिंपी ,मुख्तार खाटीक , शेतकरी सघटनेचे शिवाजीराव पाटील , गोविंदा बाविस्कर , अरुण देशमुख , भागवत पाटील , बाळू पाटील ,अरुण शिंदे , गौरव पाटील हजर होते तर पंचायत राज विकास मंचाने तालुकाध्यक्ष सुरेश अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाठींबा दिला.
कृषी क्षेत्रात उतुंग कामगिरी केल्याने कृषि भूषण ही पदवी मिळालेले माजी आमदार साहेबराव पाटील हे या शेतकरी विरोधी कायद्याचा विरोधातील भारत बंद च्या अनुषंगाने अमळनेर मधील सर्व पक्षीय अमळनेर बंदच्या रॅलीत अनुपस्थित राहिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.







