जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथील महिलेने पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने गळफास देवून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीसात कलम ३०२ प्रमाणे पत्नीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीस अटक केली आहे.
दिलीप विश्वनाथ सोनवणे (वय – ३५) राहणार गोंडखेड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दिलीप सोनवणे यांची पत्नी संगीता दिलीप सोनवणे (वय ३२) असे महिलेचे नाव असून पत्नी संगीता हिच्या चारित्र्यावर सारखा संशय घ्यायचा. यावरून त्याच्यांत नेहमी वाद व्हायचे त्याचे पर्यावसन कालच्या घटनेत संगीताकडुन पती दिलीप याला संतापाच्या भरात गळफास देत हत्या केली. ही घटना ६ एप्रिल रोजी रात्री ११:३० ते १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मृताची बहिण कल्पना युवराज जाधव यांच्या फिर्यादी वरून आरोपी मयताची पत्नी संगीता सोनवणे हिला पोलिसांनी अटक केली आहे. जामनेर पोलिसात कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.







