अमरावती ( वृत्तसंस्था ) – मुंबईतील साकीनाका सामूहिक बलात्कार व हत्याकांड आणि अमरावतीतील अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरलं असतांना आज पुन्हा जिल्ह्यात 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घडली.

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाण्याअंतर्गत वनोजा गावात अत्याचाराची घटना घडली 11 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे मुलीचे आई-वडील दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करण्यासाठी गेले. मुलीला आजी आजोबांकडे सोडलं. पण पिडीत मुलगी शौचासाठी गेली असताना मुलीला शेतात जाऊ म्हणत तरूणाने पिडीतेला दुचाकीवरून लांब शेतात नेलं.
शेतात कोण नसल्याचं बघून त्याने लहान मुलीवर अत्याचार केले. आई वडील घरी आल्यानंतर मुलगी रडताना दिसली. त्यावेळी मुलीला विचारणा केल्यानंतर मुलीने झालेली घटना आई वडिलांना सांगितली. त्यानंतर आई वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हे दाखल केले आणि गुन्हेगारांना अटक केली आहे.
दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गतही एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ही अल्पवयीन मुलगी 17 वर्षाची होती. यातून 7 महिन्याची गर्भवती असताना बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतःला गळफास लावून घेतला. येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. अमरावतीत दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहे.







