जळगाव ( प्रतिनिधी ) – मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलुन घरात नेल्यावर ७ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या पाचोऱ्याच्या २२ वर्षीय आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे .
७ मार्च २०१८ रोजी दुपारी आरोपी भैय्या भरत गायकवाड (22 ,श्रीराम नगर,सिंधी कॉलनी पाचोरा) पिडीत बालिकेला मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलुन घरात घेवून गेला. आरोपीने तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याची फिर्याद पिडीतेच्या आईने पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यानुसार गु.र.न. २८/१८ भा.द.वि. कलम ३७६,३२३,३५४ ५०४,५०६ व ५११ आणि बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ चे कलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. एस. एन. माने (गाडेकर) यांच्या न्यायालयासमोर खटला चालला सरकारपक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. ७ वर्षांची पिडीता, तिची आई, तपासी अंमलदार व डॉक्टर आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तपासी पोलिस अधिकारी दत्तात्रय नलावडे यांनी योग्य तपास केला सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
आरोपी भैय्या गायकवाडला भा.दं.वि. कलम ३७६(२) (एफ) (आय), ३५४-अ, ३५४-ब आणि बाल लैंगीक अत्याचार अधिनियम लै.अ.प्र.अधिनियम २०१२ चे कलम ३ व ४ प्रमाणे दोषी धरुन शिक्षा सुनावण्यात आली. भा.द.वि. कलम ३७६(२)(एफ)(आय) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ चे कलम ३ व ४ साठी दहा वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व २५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व भा.द.वि. कलम ३५४-अ साठी दोन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली भा.द.वि. कलम ३५४-ब साठी तिन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली
सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील केतन जे. ढाके यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. सात वर्ष वयाच्या बालिकेसोबत केलेले हे कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छबीला काळीमा फासणारे असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपी भैय्या गायकवाड यास दोषी धरले आहे. पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. विजय पाटील यांनी सहकार्य केले.