यावल ( प्रतिनिधी ) – यावल शहरातील कुंभारटेकडी येथून शिवण क्लासला जावून येते असे सांगून गेलेली तरूणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, यावल शहराला लागुन असलेल्या कुंभारटेकडी परिसरात राहणारी सपना रघुनाथ कुंभार (वय – १८) ही तरूणी तिचे वडील पाळधी, ता.धरणगाव येथे काही कामा निमित्ताने गेले असता कुंभारटेकडी यांच्या घरी त्यांची पत्नी मुलगा व मुलगी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी सपना कुंभार ही शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शिवण क्लासला जाते असे आईला सांगुन गेली. सायंकाळी उशीरापर्यंत तरूणी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. रविवारी १६ ऑक्टोबर रोजी तरूणीच्या नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रारीवरून यावल पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालक बाऱ्हे हे करीत आहे.