जळगाव (प्रतिनिधी) – पहूर पोलीस स्टेशनचे पहिले पोलीस निरीक्षक म्हणून राहुल खताळ यांची नियुक्ती झाली यावेळी अभाविप पहुरच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पहूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ७९ गावे असून लोकसंख्या मोठी असल्याने येथे पोलिस निरीक्षक पदासाठी अनेक दिवसांची मागणी होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .प्रवीण मुंडे यांच्या आदेशान्वये खताळ यांना पहूर पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वी १५ वर्षांच्या कार्यकाळात रत्नागिरी , गडचिरोली, नवी मुंबई ,अकोला आदी ठिकाणी सेवा दिलेली आहे. पहुर पोलीस स्टेशनला लाभलेले पहिले पोलीस निरीक्षक राहुलजी खताळ यांचे पुष्पगुच्छ व अभाविप सेवाकार्य माहिती पत्रक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सरांना अभाविप कार्याचा परिचय देऊन सामाजिक, शैक्षणिक विषयावर चर्चा झाली यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य मनोज जंजाळ , अभाविप पहूरचे सचिन पाटील व महेश नरवाडे उपस्थित होते.