• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नरेंद्र मोदी यांच्या गुगलीमुळे ही नवी राजकीय आघाडी गोंधळात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2020
in भारत
0

श्रीनगर (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरमध्ये 28 नोव्हेंबरपासून आठ टप्प्यात डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल (डीसीसी) म्हणजेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकाही यावेळी होणार आहेत. मात्र काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्या स्थानिक प्रादेशिक पक्षांचा समावेश असलेल्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) या आघाडीला अद्याप नेमकी भूमिका घेता आलेली नाही. जिल्हा परिषदांच्या निवडणूका घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुगलीमुळे ही नवी राजकीय आघाडी गोंधळात पडली आहे.
कलम 35अ सह जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा पुन्हा प्रस्थापित करून राज्याच्या हिताचे रक्षण करण्याच्या नावाखाली फारुक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स, मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम), जे अँड के पीपल्स कॉन्फरन्स, अवामीन नॅशनल कॉन्फरन्स हे राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्दबातल ठरवल्यानंतर या निर्णयाला विरोध करण्यासाठी श्रीनगरमधील गुपकार मार्गावरील फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी या पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्याने त्यातील निर्णयाला गुपकार जाहीरनामा (गुपकार डिक्लेरेशन) असे संबोधले गेले. त्यातून पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) ही नवी राजकीय आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये उदयास आली आहे.

जम्मू-काश्मीर हा आता विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा अंतिम सामना असल्याचे मानले जात असल्याने या निवडणुका लढवण्याबाबत कार्यकर्त्यांकडून दबाव असला तरी अनेक कारणांमुळे आघाडीच्या नेत्यांना त्याबाबत ठोस निर्णय घेता आलेला नाही.

या निवडणूका लढवल्या तर त्यांचे विशेष दर्जासाठीचे आंदोलन आपोआप संपुष्टात येईल. नाही लढल्या तर पक्षाचे कार्यकर्ते सैरभैर होऊन ताकद कमी होईल त्याचबरोबर शासन यंत्रणेवर विश्वास नसल्याचा ठपका त्यांच्यावर येईल. दुसरीकडे या निवडणुकी पक्षचिन्हावर लढून जम्मू-काश्मीर भगवा रंगात रंगवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. त्यामुळे भाजपची शक्तीशाली विरोधक असलेली पीएजीडी काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदांच्या तब्बल 280 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या जिल्हा परिषदांची मुदत पाच वर्षांची आहे. या निवडणुका जाहीर करून केंद्र सरकारने राज्यात लोकशाही प्रक्रिया सुरु करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे.गेल्या वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये ज्या गोष्टीची तीव्रतेने कमतरता भासत होती ती म्हणजे राज्य कारभारातील लोकप्रतिनिधींचा सहभाग जवळपास शून्य झाला होता. त्यामुळे शासन यंत्रणेवरील लोकांचा विश्वास डगमगू लागला होता.

आता सरकराने स्थानबद्ध केलेल्या सर्व राजकीय नेत्यांची सुटका केली आहे आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्याने जम्मू-काश्मीरमधील राजकीय हालचालींना वेग येईल असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीएजीडी ही आघाडी निवडणुकीतील सहभागाबाबत काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

फक्त ‘या’ कारणासाठी राम रहीम पॅरोलवर लपून छपून बाहेर

Next Post

हे जिवाश्‍म साडेसहा कोटी वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हे जिवाश्‍म साडेसहा कोटी वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
1xbet russia

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

February 21, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon