जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील ७८१ ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेवरून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनो संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते जून महिन्यात होणार्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रद्द झाल्या होत्या. जूनमध्ये कोरोना संसर्ग अधिक वाढल्याने मुदत संपलेल्या व जून ते डिसेंबर दरम्यान होणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्त्या करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ७८१ ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे लवकरच या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.








