नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर भारतात पाहायला मिळत आहे. त्यातच देशात दररोज कोरोनाबाधितांचे समोर येणारे आकडे धडकी भरवणारे आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर मात करुन घरी परतले आहेत.
महाराष्ट्रात काल तब्बल 62 हजार 194 कोरोनाबाधितांची नोंद झाली, 63 हजार 842 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 42,27,940 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.54% एवढा झाला आहे. तर राज्यात काल 853 कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.
तर काल मुंबईत एकूण 3056 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 2 हजार 383 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण 50 हजार 606 आहे. कोरोना दुप्पटीचा दर आता 130 दिवसांवर गेला आहे. तर कोरोना वाढीचा दर (29 एप्रिल-3 मे) 0.51 टक्क्यांवर गेला आहे.