• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबई मॉडेलवर हसणाऱ्यांना पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांचे उत्तर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – एप्रिलच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आता झपाट्याने कमी झाली आहे. मुंबईला हे यश शहरामध्ये राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मिळाले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या या कामाचे कौतुक देखील केले होते.

न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मुंबई मॉडेलसारख्या इतर काही ठिकाणी सुविधा करता येऊ शकतात का हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन आमच्यावर हसवण्याचेच ठरवले असेल तर मुंबई मॉडेल आम्ही देशाला कसे समजवून सांगणार? अशी प्रतिक्रिया आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या समस्येवर प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर मुंबई मॉडेल इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये राबवता येऊ शकते, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मांडले आहे.

भारतीय प्रशासनात काम करणारे मित्र दोन महिन्यांपूर्वी मला फोन करुन फक्त महाराष्ट्रातच कोरोना आहे का, असे प्रश्न विचारत हसत होते. जर एखादी व्यक्ती आपल्यावर हसत असेल तर माझी काम करण्याच्या मॉडेलबाबत मी त्यांना कसे सांगेन? जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिकण्याची वेळ नसते, तेव्हा त्या मॉडेल्सप्रमाणे काम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नसल्याचेही आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दि इंडियन एक्स्प्रेसच्या न्यूजरूम आयडिया एक्सचेंजच्या कार्यक्रमात सांगितले.

बेड्स वाढवण्याची सक्ती कोणत्याही रुग्णालयामध्ये करू नये, असे मी दिल्ली सरकारला सांगितले आहे. ऑक्सिजनयुक्त बेड वाढवल्यामुळे रुग्णालयांकडून एसओएस कॉल वाढत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन मिळत नसल्याचे चहल यांनी सांगितले. उपलब्ध ऑक्सिजनचा योग्य उपयोग, योग्य वितरण आणि बफर स्टॉक तयार ठेवणे, यामुळे मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहासजमा झाल्याचे चहल म्हणाले.

मुंबईत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झाला नसल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. पण एका मध्यरात्री आलेल्या संकटाबद्दल त्यांनी सांगितले. ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे १६ आणि १७ एप्रिलच्या मध्यरात्री सहा रुग्णालयातील १६८ रुग्णांना मुंबईच्या ‘जम्बो’ कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. त्यातील ४० रुग्णांची परिस्थिती गंभीर होती. अखेर सकाळी १ ते ५ च्या दरम्यान सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर मला १०० टक्के रुग्णांचा जीव वाचवता आला याचा आनंद असल्याचे चहल म्हणाले.

राज्याच्या टास्क फोर्ससोबत या घटनेनंतर संपर्क साधत आम्ही ऑक्सिजनच्या वापरासाठी प्रोटोकॉल ठरवण्याची विनंती केली. ऑक्सिजनचे कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत आपण दिल्लीतही याबाबत बोललो असल्याचे चहल म्हणाले. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव आणि आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील आठ मुख्य राजकारण्यांनाही मी याबाबत सांगितल्याचे चहल म्हणाले.

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना चहल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर वॉर्ड वॉर रूम तयार करणे, बेडसाठी डॅशबोर्ड तयार करणे, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना तो रिपोर्ट त्याच्याकडे न देता महापालिकेला कळवणे, यासारखे उपाय केले होते. पहिल्या लाटेनंतर जम्बो कोविड सुविधा असलेले हॉस्पिटल बंद न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुसरी लाट हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी मुंबईत आधीच तयारी करत असल्याचे चहल यांनी सांगितले. अधिक जम्बो सुविधा असलेले जवळजवळ ५,५०० बेड्स उपलब्ध करत आहोत त्यातील ७० टक्के हे ऑक्सिजन बेड्स असतील, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त चहल यांनी दिली.


 

 

Previous Post

माजी आ.गुरुमुख जगवानी यांची कलावंतांना मदत

Next Post

तामिळनाडूच्या एमके स्टॅलीन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तामिळनाडूच्या एमके स्टॅलीन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon