नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाच्या साथीच्या विरोधात लढताना, कोविड-19 विरोधातल्या सामूहिक लढाईत भारतासाठी जागतिक समुदायाने मदतीचा हात पुढे केला आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारप्राप्त गट क्र. 3 ची बैठक आयोजित करण्यात आली होती.
अतिरिक्त सचिवांनी (परराष्ट्र व्यवहार) माहिती दिली की, जेव्हा मदत साहित्य परदेशातून रवाना झाल्याचे समजते तेव्हा ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठविली जाते, जे वितरण योजनेचे काम करतात.आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी माहिती दिली की, परदेशातून प्राप्त सामग्रीच्या वितरण योजना परदेशातून भारतात सामग्री पोहोचेपर्यंत तयार असतात.
भारत सरकारला 27 एप्रिल पासून विविध देशांकडून, संस्थांकडून आंतरराष्ट्रीय देणगी आणि कोविड -19 वैद्यकीय मदत सामग्री आणि उपकरणांचा पुरवठा झाला आहे. आतापर्यंत, 1841 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स; 1814 ऑक्सिजन सिलिंडर; 09 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र; 2403 व्हेंटिलेटर/बी आय पीएपी/सी पीएपी; 2.8 लाखांपेक्षा जास्त रेमडेसिव्हीरच्या कुप्या वितरित केल्या आहेत.