जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथील २५ वर्षीय तरूणीला किरकोळ वादातून ५ मे रेाजी दुपारी मारहाण करण्यात आली ६ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
नशिराबादेत खालची आळी येथे सुचिता सचिन चौधरी (वय-२५) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ मेरोजी दुपारी घरी असतांना किरकोळ वादातून हरीष पुरूषोत्तम येवले, उज्ज्वला हरीष येवले ( रा. खालची आळी ,. नशिराबाद ) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तरूणीने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ६ मे रोजी सायंकाळी संशयित आरोपी हरीष येवले, उज्ज्वला येवले यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहेत .