जळगाव ( प्रतिनिधी ) – रूग्णवाहिकेने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला ही दुर्घटना नशिराबादजवळ घडली .
एमएच १४ सीएल ०८०१ या क्रमांकाची रूग्णवाहिका भुसावळ येथून रूग्णाला घेऊन जळगावकडे येत होती नशिराबादजवळ राष्ट्रीय महामार्गावर एमपी ०९ एक्सएफ ७२२२ या क्रमांकाच्या मोटारसायकलला तिने धडक दिली. या धडकेत रोशन कुमार जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक अपघातस्थळी धावले. त्यांनी रोशन कुमारला रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू केली असतांनाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नशिराबाद पोलीस स्थानकात रात्री उशीरा नोंद घेण्यात आली . मयत रोशन कुमार हा बिहारमधील रहिवाशी असल्याची सांगण्यात आले .