रावेर ( प्रतिनिधी ) – फक्त १३० रूपयांच्या उधारीवरून तरूणाचा खून करणार्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील ऐनपूर येथे १३० रूपयांच्या उधारीसाठी तरूणाचा गुप्तांग पिरगळून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली भीमसिंग पवार या तरूणाला प्राण गमवावे लागले आरोपी पन्नालाल कोरकू यास अटक करण्यात आली आहे.
पन्नालाल कोरकू याला रावेर न्यायालयात हजर केले. सोमवारपर्यंत त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्ह्याचा तपास निंभोरा पोलिस ठाण्याचे स पो नि गणेश धुमाळ, पो कॉ ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी करत आहेत.