जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेरात व्यापार्यांच्या दोन गटांमध्ये व्यवहारावरून तुंबळ हाणामारी झाली.
जामनेर व भुसावळ येथील दोन कापूस व्यापार्यांमध्ये जुन्या बोदवड रोडसह भुसावळ रोडवर पोलिस ठाण्यासमोर वाद झाले. यता दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांनी पोलिस ठाण्यापासून नगरपालिका चौकापर्यंत हाणामारी करणार्यांसह समर्थकांवर लाठीमार करून जमाव पांगवला.
हा गोंधळ पाहून सराफ बाजारातील व्यापार्यांनी दुकाने बंद केली होती. पोलिसांनी वादातील प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरा तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते शहरात शांतता आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. शहराची शांतता भंग करणार्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा पो नि किरण शिंदे यांनी दिला आहेे.