नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – आता घरगुती सिलिंडरचा भाव तेल कंपन्यांद्वारे ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलिंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.
मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याचवेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत २२५३ रुपये करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेशा आहेत.