जळगाव ( प्रतिनिधी ) – लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन व व्याख्यानाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करून त्रिशरण, पंचशील घेण्यात आले, यावेळी प्रमुख व्याख्याते भारत ससाणे (संविधान जागर समिती प्रमुख ) व सुमित्र अहिरे ( राज्य कार्याध्यक्ष बामसेफ ) होते.
या कार्यक्रमात मनोहर खोंडे ( कीर्तनकार ) , अँड . सत्यजित साळवे , अरुण गवळी ,विशाल वाघ ,शिवम सोनवणे , सागर सपकाळे ( अध्यक्ष कुसुमताई फाउंडेशन ) याची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राहुल भोई, गामिर शेख, विशाल सुरवाडे, पिंटू सोनवणे, चंद्रसेन निकम, सचिन सुरवाडे, देवनांद निकम, खुशाल सोनवने, राहुल सोनवणे, प्रकाश सोनवणे, सागर सोनवणे, मुकेश सावकारे, सुनील देहडे तसेच परिसरातील नागरिक आणि युवक उपस्थित होते. सूत्रसंचालन .विजय सुरवाडे यांनी व प्रस्ताविक .निलेश बोरा ( जैन ) यांनी केले आभार इरफान शेख यांनी मानले.