पुणे ( प्रतिनिधी ) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ साठवण तलावात बुडून तीन युवकांचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृत तरुण दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेली माहितीनुसार तिघेजण पोहण्यासाठी दुचाकीवर तलावात गेले होते. बराच वेळ झाल्याने घरी आले नाही. यामुळे घराच्यांनी मोबाईल वर फोन लावला असता फोन बंद होता. त्यानंतर शोधाशोध सुरु केली पाण्याच्या तलावाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले. या युवकांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोध घेत असताना तळ्याजवळ गाडी मिळून आली. त्यामुळे शोध घेणाऱ्याचा संशय बळावला. त्यांनी तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय आल्याने दौंड पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटना स्थळावर धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलीसांनी तलावातील पाण्यात शोध घेतला.तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. पाण्याच्या बाहेर काढून तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.