मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबई रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या एका चीफ बुकिंग सुपरवायझरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानक पश्चिम परिसरातील कार्यालयात घडली. कैलास कदम (वय-55) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतीली विद्याविहार रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात असलेल्या कार्यालयात कैलास कदम हे सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. ते कार्यालयात आले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सकाळी ते घरुन निघून थेट कार्यालयात आले. काम सुरु करण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. कैलास कदम यांनी आत्महत्या केल्याचे समजता इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती घाटकोपर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चीफ बुकिंग सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या कैलास कदम यांनी गुरुवारी सकाळी रेल्वेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कैलास कदम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.







