गोर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने सुभाष जाधव यांचा सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) –जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंयत निवडणुक लढविण्यात येत असून पारोळा तालुक्यात ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. सदर तालुक्यातुन ९ गावांची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली आहे.
यात सर्वात मोठा मताधिक्य असलेली तसेच सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारे वसंतनगर तांडा हे गाव बिनविरोध निवड करण्यात आले आहे, हे गाव स्वातंत्र्यानंतर प्रथमच बिनविरोध निवडून आले असून या सर्वाचे क्षेय वसंतनगर गावाचे गट विकास अधिकारी सुभाष जाधव यांना जातो सुभाष जाधव यांनी गावातील भांडण उकरून काढले आणि लोकांना आश्वासन दिले की मी कोणत्याही परिस्थितीत गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीन गावाची सुधारणा हेच माझे खरे उद्देश आहे. गावात जर निवडणूक बिनविरोध झाली तर केंद्र शासनाकडुन तसेच राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्या निधीचा गावाच्या विकासासाठी उपयोग होईल आणि त्यांचा या प्रयत्नांना यश मिळाले व कधी एक न होणार्या तसेच अटीतटीची व चुरशीची निवडणूक लढविणारा हा गाव एक झाले त्याचे खरे श्रेय जाते ते सुभाष जाधव यांना म्हणून आज जळगाव येथे गोर सेना या सामाजिक संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष अँड. सागर राठोड यांनी त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला . ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या . पुढील वाटचालीसाठी अभिनंदन केले. या प्रसंगी जिल्हा सचिव चेतन जाधव, बंजारा युवा फाउंडेशन चे अध्यक्ष बी बी धाडी , गोरसिकवाडी संयोजक जळगाव भारमल नायक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते, या सर्वानी जाधव सरांचे फुल पुष्प देऊन अभिनंदन केले.







