एन.जे. पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दयांवर दुध संघाचा खुलासा
जळगाव (प्रतिनिधी) – एन.जे. पाटील यांना संघाने दि १८/१२/१९९९ रोजी सेवेतून बडतर्फ केलेले आहे त्यांनी विविध न्यायालयात दावे दाखल केले होते. सर्व निकाल एन.जे. पाटील यांच्या विरोधात असून संघाने त्यांच्या विरुध्द केलेल्या कारवाईस योग्य ठरविण्यात आलेले आहे. केवळ सूडबुध्दीने ते संघ व्यवस्थापना विरुध्द खोटे आरोप करतात , असे दूध संघाचे म्हणणे आहे .
एन.जे. पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले मुद्दे, म्हणणे चुकीचे आहेत. ते नाकारण्यात येत आहेत. ऑगष्ट २०१५ पासून मंदाकिनी एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली संघाची भरीव प्रगती झालेली आहे. संघात १९९५ ते २०१५ या कालावधीत एन.डी.डी.बी. चे व्यवस्थापन कार्यरत होते. तदनंतरच्या काळात अर्थात ऑगष्ट २०१५ नंतर एन.डी.डी.बी. च्या कार्यकाळापेक्षा जास्त दूध संकलन दूध संघात झालेले आहे. निर्वाचित संचालक मंडळाने दुधाचे दर सन २०१५ वर्षाच्या तुलनेत दूध उत्पादकांना जास्त अदा केलेले आहेत. संघाची प्रक्रिया क्षमता ३ लाख लीटर्स प्रती दिन वरुन ५ लाख लीटर्स प्रती पर्यंत केलेली आहे. पॅकींग क्षमता सुध्दा १.५० लाख लीटर्स वरुन ३.०० लाख लीटर्स प्रती दिन पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. दुग्धजन्य पदार्थ अर्थात श्रीखंड, दही, पनिर इ . साठी नविन इमारत उभारण्यात आलेली आहे.
हे प्रकल्प एन.डी.डी.बी. ने टर्न की, बेसीसवर पूर्ण केलेले आहेत. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गतमार्च २०१९ पर्यंत सुमारे २०कोटी रुपये अनूदान व संघाने २३.०० कोटी एन.डी.डी.बी. कडून दिर्घकालीन मुदतीचे कर्ज घेतलेले आहे. संघाकडे मार्च २०१९ मधे एन.डी.डी.बी. कडून लोणी व दूध भुकटीसाठी लागणारे रु. ३७.०० कोटी खेळते भांडवल घेतलेले आहे त्यापोटी संघाकडे त्यापेक्षा जास्त किंमतीचे लोणी व दूध भुकटी साठा उपलब्ध होता. संघ सन २०१५ पासून दरवर्षी सतत नफा कमवित आहे. एन.जे. पाटील यांनी रक्कम रु. ११७/- कोटी बद्दल केलेले विधानामधे काहीही तथ्य नाही.
संघाने लेखापरिक्षणासाठी लागणारे कॉर्ड जाळलेले नाही. रेकॉर्ड नष्ट करणेबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच कारवाई करण्यात येते.
एन.जे.पाटील यांना संघाच्या सेवेतून बडतर्फ केल्यानंतर संघाची प्रगती होत असतांनाही वेळोवेळी संघाबद्दल दिशाभूल करणारी विधाने करीत असतात. एन.जे. पाटील यांनी संघाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुध्द मानहानी नुकसानीचा रु. १/- कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा फौजदारी दावा करण्यात येईल असेही जिल्हा दूध संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .