२५ वर्षांचे रेकॉर्ड बेकायदेशीरपणे का नष्ट केले ? ; ३ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा नागराज पाटील यांचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी) – ५७ कोटींच्या अनुदानातून मंदा खडसे यांनी जिल्हा दूध संघाचा काय विकास केला ? ,असा प्रश्न विचारत जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी २५ वर्षांचे रेकॉर्ड बेकायदेशीरपणे का नष्ट केले ? ; ३ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा असा आरोप आज पत्रकार परिषदेत जाहीरपणे केला आहे .
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडविणाऱ्या या पत्रकार परिषदेत नागराज पाटील पुढे म्हणाले की, ते १९८८ ते १९९९ या काळात जिल्हा दूध संघाचे सुरक्षा अधिकारी होते. त्यांनी स्वतः या दूध संघातील गैरकारभाराविरोधात पोलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत त्यापैकी १८ याचिकांवर कोर्टात सुनावणी सुरु आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या दूध संघाच्या सध्याच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट २०२० मध्ये संपलेली आहे त्यानंतरही राज्य सरकारने राजकीय दबावातून या संचालक मंडळाला मुदतवाढ देताना प्रशासकाची नियुक्ती केलेली नाही. एनडीडीबीकडे व्यवस्थापन सोपवताना कायदेशीर करार केलेला नाही. त्यामुळे १२ वर्षांचा हा कारभार अवैध आहे मुळात प्रशासक नेमणुकीचे आदेशच बेकायदा आहेत कराराच्या अनुषंगाने संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ बेकायदा आहे हा फौजदारी गुन्हा असल्याने आपण पोलिसांकडे गुन्हा दाखल केलेला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा १८२ / २०१३ नुसार दाखल आहे त्यात ११४ आरोपी आहेत पोलिसांनी याची गेल्या ७ वर्षात काहीच चौकशी केलेली नाही. त्यामुळे मी उच्चं न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुलाबराव देवकर पालकमंत्री असताना संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ बेकायदा आहे म्हणून पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार २०१ / २०१८ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात १ नंबरचे आरोपी एकनाथराव खडसे आणि १५ क्रमांकाच्या आरोपी मंदाताई खडसे आहेत ऑगस्ट २०१५ महिन्यात या दूध संघावर काहीच कर्ज नव्हते आता कर्ज वाढले कसे ? असा प्रश्न नागराज पाटील यांनी उपस्थित केला आहे. हा सगळा अंदाजे ३ हजार कोटींचा गैरव्यवहार असल्याचाही आरोप नागराज पाटील यांनी आज केला .
२०१४ सालात युतीच्या सरकारमध्ये ११ खात्यांचे मंत्री असलेले खडसे यांच्याकडे कृषी व दुग्ध विकास खाते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. त्यामुळे जिल्हा बँक आणि दूध संघावर त्यांचे वर्चस्व होते. रोहिणी खडसे जिल्हा बँक आणि मंदा खडसे दूध संघाच्या अध्यक्ष झाल्या मंदा खडसे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच जिल्हा दूध संघ डबघाईला आला त्यांनी दूध संघाचे १९७५ ते २००० या २५ वर्षांच्या काळातील रेकॉर्ड पोलिसांची किंवा न्यायालयाची परवानगी न घेता बेकायदेशरीर पणे नष्ट केले. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आणि कोर्टाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.
जिल्हा दूध संघाचा ताबा १९९५ ते २०१२ पर्यंत एनडीडीबीकडे होता. त्यांनीही चुकीचे निर्णय घेतले त्याबद्दल माझ्या फिर्यादीनुसार १३ डिसेंबर २०१३ रोजी १८२ / २०१३ क्रमांकाचा गुन्हा नोंदवलेला आहे. पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही आता तर रेकॉर्डच नष्ट झाले आहे याबद्दलही मी जिल्हा न्यायालयात याचिका क्रमांक २०१/२०१८ दाखल केली आहे. या खटल्यात जुने रेकॉर्ड पुरावे म्हणून महत्वाचे ठरले असते माझंक्सय या आरोपाबद्दल मंदा खडसे यांनी जाहीर खुलासा करावा अशी माझी जाहीर मागणी आहे.
त्या काळात एकनाथराव खडसे मंत्री होते म्हणून सगळे अनुभवी संचालक त्यांच्या दबावामुळे गप्प होते मंदा खडसे अध्यक्ष झाल्या त्यावेळी जिल्हा दूध संघावर एक रुपयाही कर्ज नव्हते अन्य बँकांमध्ये दूध संघाच्या ठेवी होत्या आता ३१ मार्च २०१९ च्या ताळेबंदात या दूध संघावर ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिसते आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून ५७ कोटींचे अनुदानही या दूध संघाला या काळात मिळाले आहे या ११७ कोटी रुपयातून मंदा खडसे यांनी दूध संघाचा कोणता विकास केला ?, हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी माझ्या या प्रश्नाचा जाहीर खुलासा करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , असेही ते म्हणाले अन्य ५ आरोपांबद्दलही आपण लवकरच माहिती देउ असे नागराज पाटील यांनी यावेळी सांगितले .