रावेर (प्रतिनिधी) – केद्रं सरकारने आणलेल्या नवीन कायद्याचा विरोधात पंजाब, हरियाणा, चंडीगढ़ यासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीचा सीमेवर 10 दिवसापासून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु केलेले आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्याऐवजी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विरोधात पंजाब, हरियाणा, चदिंगड सह भारतातील असंख्य शेतकरी संघटना नवीन कृषि कायद्याच्या विरोधात एकवटल्या आहेत. त्या संघटनांनी 8 डिसेंबर मंगळवार रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. या बंदला रावेर तालुका महाविकास आघाडी ने पाठिंबा जाहीर केला आहे. या बंद मधे शेतकरी बांधव, व्यापारी, उद्योजक, दुकानदार, टपरीधारक शेतमजूर, सर्व नागरिक यांनी एक दिवस आपले व्यवहार बंद ठेवुन सहभागी व्हा व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करीत निवेदनाद्वारे केलं असून त्या प्रती रावेर तहसीलदार व रावेर पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष किसान सभा सोपान दादा पाटील राष्ट्रवादी जळगाव उपाध्यक्ष रमेश महाजन, जळगाव जिल्हा,योगिराज पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख, रावेर नीळकंठ चौधरी,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावेर, ज्ञानेश्वर महाजन अखिल भारतीय कांग्रेस तालुका अध्यक्ष रावेर, कार्याध्यक्ष विलास ताठे राष्ट्रवादी रावेर, शे मेहमूद शहराध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन, सामाजिक न्याय युवक तालुकाध्यक्ष कुणाल महाले, शहर उपाध्यक्ष जितेंद्र साबळे, संतोष पाटील, पुरूषोत्तम पाटील, आरीफ मेंबर, शे.इरफान, कैलास वाणी, भूपेंद्र जाधव, शे, शब्बीर शेख कदीर,शे गयास , पंडित महाजन, संजय पवार,बाळू शिवतुरे, अयुबा खाॅ,सह अनेक रावेर तालुका महाविकास आघाडी कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.








