जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या फुले शाहू आंबेडकर विचारमंच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासमंडळ, विचारधारा प्रशाळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन भिमगीत व शाहीरी स्पर्धेत महाविद्यालयीलन गटात नागपूरच्या संकेत विरकर याने तर खुल्या गटात नागपूरच्याच डॉ.पंकज गजभिये यांनी प्रथम क्रमांचे पारितोषिक प्राप्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन फेऱ्यांमध्ये ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत भारताच्या विविध भागांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. रविवार दि. ६ डिसेंबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी झाली. या स्पर्धेचे परिक्षण शाहीर आझाद कोल्हापूरकर, डॉ. अशोक अभंग आणि अमोल जाधव यांनी केले.







