जळगाव ( प्रतिनिधी ) – रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेचा साडेतीन लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी पतीसह सासरकडील मंडळींकडून छळ सुरु होता एमआयडीसी पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या श्रद्धा हिप्पर (वय-२३) यांचा विवाह २०१९ मध्ये मनमाड येथील तुषार हिप्पर यांच्याशी झाला. सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती तुषार हिप्पर याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आणल्यामुळे तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. सासू, सासरे आणि दीर यांनीदेखील पैशांसाठी विवाहितेला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.१६ एप्रिलरोजी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती तुषार हिप्पर, मंगलाबाई हिप्पर, ज्ञानेश्वर हिप्पर आणि अक्षय हिप्पर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ संजय धनगर करीत आहेत .