• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – एनआयए कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली. चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्याप्रकरणी अटक असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत वाढ करण्यात आली. कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत कोठडी वाढवली आहे.

अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.

दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत आणि नंतर ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली होती.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला सापडलेली स्कॉर्पिओ कार तीन वर्षांपासून मनसुख यांच्या ताब्यात होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले. पोलीस यंत्रणांनी जेव्हा मनसुख यांच्याकडे जाब विचारला तेव्हा ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाली, त्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती असं सांगितलं होतं. यानंतर ५ मार्चला मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे मनसुख यांचा मृतदेह सापडला. आदल्या रात्री ते कांदिवलीतील तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते.

मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळी उभी केली, असा संशय एनआयएला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.

एनआयएने सोमवारी महागडी दुचाकी जप्त केली. एका महिलेच्या नावे नोंद असलेल्या या दुचाकीचा वापर मुख्य आरोपी सचिन वाझे करीत होते, असा दावा ‘एनआयए’ अधिकाऱ्याने केला. गेल्या वर्षी वाझे यांनी दुचाकीवरून काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला होता. त्या सफरीत वाझे यांनी हीच दुचाकी वापरल्याचा संशय आहे. ही दुचाकी दमण येथून जप्त करण्यात आली. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळेल्या स्कॉर्पिओसह आठ महागड्या गाड्या ‘एनआयए’ने हस्तगत केल्या आहेत. त्यात वोल्वो गाडीचाही समावेश असून ती दमण येथून जप्त करण्यात आली होती.

दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट नावाचा वापर करत वाझे यांच्यासाठी एक खोली आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती तपासादरम्यान ‘एनआयए’ला मिळाली. या माहितीत तथ्य आढळले असून सीसीटीव्ही चित्रणातून वाझे यांची या हॉटेलमध्ये ये-जा होती, असेही स्पष्ट झाले. एका सीसीटीव्ही चित्रणात ‘एनआयए’ अधिकाऱ्यांना वाझेंसोबत एक महिला आढळली. सोमवारी जप्त करण्यात आलेली दुचाकी याच महिलेच्या नावे नोंद होती, असे समजते.


 

 

Previous Post

रावेरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

चाळीसगावात बंद दुकान तोडून अज्ञात चोरट्यांनी लांबवले अडीच लाख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावात बंद दुकान तोडून अज्ञात चोरट्यांनी लांबवले अडीच लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon