जळगाव (प्रतिनिधी) – अयोध्या येथे काल दि. ५ ऑगस्ट रोजी, भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिराची पायभरणी सोहळा,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यानिमित्ताने भाजपा मंडल क्र. २ सराफ बाजारातील जाडीया मंगल कार्यालयामध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
store advt

प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेच्या पूजनाप्रसंगी आमदार तथा भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजूमामा भोळे,, जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा महानगर उपाध्यक्ष सुनील माळी, किशोर चौधरी, कपिल पाटील, मुकुंद मेटकर, ओबीसी मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे व युवा मोर्चाचे पदाधिकारी मंडल अध्यक्ष परेश जगताप, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस कल्पेश ढिवरे व मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.







