पारोळा (प्रतिनिधी)- पारोळा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत उपसभापती पदासाठी आज निवडणुक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे दगडु तुळशिराम पाटील यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे निवडणुक अधिकारी जी.एच.पाटील यांनी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दगडु तुळशिराम पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचा जाहीर केले. यानिवडीबद्दल आमदार चिमणराव पाटील व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
दगडू पाटील यांनी शेतकरी, व्यापारी ,मापाडी, हमाली यांची सेवा करून त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी काम करावे असे आमदार चिमणराव पाटील निवड सभेत म्हणाले.
यावेळी बाजार समितीचे संचालक श्री.चतुर भाऊसाहेब, पी.के.पाटील, मधुकर पाटील, प्रेमानंद पाटील, प्रा.बी.एन.पाटील, विजय पाटील, दिपक पिंगळे, राजु खाडे, पोपट वंजारी, आशा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, जिजाबराव बापु, सखानाना, बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख भुषण भोई आदी. तसेच पत्रकार व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.







