नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील 5 राज्यातील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल – डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलचे भाव आता पुन्हा वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार वर टीका केली आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं कारण देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरु’ असं ट्वीट केलं आहे. तर त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती असा हॅशटॅग दिला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर ते सातत्याने टीका करताना दिसतात. दिल्लीत आज पेट्रोल प्रति लिटर ९०.९९ रुपये आणि डिझेल ८१.४२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपये आणि डिझेल ८८.४९ रुपये आहे.







