नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात भाजपला खडेबोल सूनवल्या नंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संज्या राऊतला काय अधिकार मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा ?? असा सवाल करत त्यांनी संजय राऊतांना लक्ष केलं आहे.
‘संज्या राऊतला काय अधिकार मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा? ज्या माणसाने मराठा समाजाची खिल्ली उडवली आणि आजपर्यंत माफी मागितली नाही तो माणूस मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय योगदान आहे शिवसेनेचं? आम्ही आमचं बघून घेऊ संज्या तू पवार साहेबांची भांडी घासत रहा’, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून पंतप्रधानांची वेळ मागणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्यासोबत यावं आणि त्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं.