जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हात शिवसेना संपर्क अभियान ( दुसरा टप्पा ) 25 ते 29 मेदरम्यान होणार आहे या अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज दुपारी शहरातील अजिंठा रेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती
या नियोजनाच्या बैठकीसाठी जिल्ह्यातील भडगांव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा येथील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महानगरप्रमुख, तालुका / महानगर संघटक, समन्वयक, शहरप्रमुख, शहर संघटक, विधानसभा क्षेत्र प्रमुख, महिला आघाडी महानगरप्रमुख व पदाधिकारी, अल्पसख्यांक आघाडी व विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी, युवासेना अधिकारी उपस्थित होते
शिव संपर्क अभियान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ना आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार खा .संजय राऊत , अनिल देसाई , . रवींद्र मिर्लेकर , संजय सावंत , .ना.गुलाबराव पाटील ,सुनील पाटील (संपर्क प्रमुख भडगांव, पाचोरा) व आमदार यांचे मार्गदर्शनाने होणार असुन, अभियानाचे प्रमुख उपनेते लक्ष्मण वडले असणार आहेत सोबत संजय सावंत , ना.गुलाबराव पाटील , आमदार, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आदीचे मार्गदर्शन लाभणार आहे.
जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) , विष्णू भंगाळे , महिला आघाडी जिल्हा संघटक महानंदा पाटील , युवा सेने जिल्हाधिकारी शिवराज पाटील आदी उपस्थित होते .