मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूडचे ज्येष्ठ, सुप्रसिद्ध आणि दिग्ज अभिनेते ‘दिलीप कुमार’ त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटत असतात. ते त्यांच्या तब्येतीबद्दल अनेकदा याच माध्यमातून अपडेटही देतात. दरम्यान, आज पुन्हा एकदा दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना काहीशी काळजीत पाडणारी बातमी समोर आली आहे.
98 वर्षांचे दिलीप कुमार यांना रविवारी (दि. 6) सकाळी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आणि अश्यातच दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे चाहत्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.