जळगाव ( प्रतिनिधी ) – इन्टाग्रामवर मैत्री करून ३३ वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्यानंतर हॉटेलमध्ये केलेले व्हिडीओ दाखवून ५० हजाराची मागणी करणाऱ्या आरोपीवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३३ वर्षीय विवाहिता कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. इन्ट्राग्रामवर त्यांचे खाते आहे. या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय-४८ , रा. जळगाव ) याची ओळख झाली. इन्ट्राग्रामवर मैत्री झाल्याने फेशीयल करण्याच्या बहाण्याने विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी घेवून गेला. विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरवून आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेवून गेल्यावर पुन्हा अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच न थांबता केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनविला. व्हिडीओ बनवून विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखविन अशी धमकी दिली. विवाहितेने संशयित आरोपी गणेश चौधरी याला समजविण्याचा प्रयत्न केला त्याने विवाहितेला मारहाण केली व तिच्या पतिकडून फेसबुकवरून पैशांची मागणी केली. विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शांताराम पाटील हे करीत आहेत .