चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील वामन नगरातील मजूराने घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञाताने लंपास केली शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
वामन नगरातील सुनिल सुधाकर बागुल (वय ४५) हा मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. मात्र त्यांनी घरासमोर उभी केलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच.१९ डीपी २८८८) अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली बागूल यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून आली नाही. म्हणून चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून बागूल यांनी भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना भुषण पाटील हे करीत आहेत .