जळगाव ( प्रतिनिधी ) – आज कुसुंबे खु!! येथे लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने नविन रेशनकार्ड व १२ अंकी रेशनकार्डचे वाटप लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .
कुंसुंबाचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ‘ आम्ही आमचे वचन पाळले’ हे कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेले फलक लक्ष वेधुन घेत होते सामान्य लोंकाना त्यांच्या हक्काचे रेशनकार्ड कार्ड उपलब्ध झाल्यामुळे लोंकाच्या चेहऱ्यावर समाधान होते यावेळी भाऊसाहेब सोनवणे , कलिंदर तडवी, शैलेश साळुंखे, गणेश पाटील, भरत महाजन किरण राजपुत , भुषण राजपुत , धनजंय दुसाने, दिपक पाटील, धनसिंग पाटील, योगेश घुगे , यांनी परीश्रम घेतले.