पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील मारूती मंदीराच्या परिसरातून वृध्दाच्या हातातून ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता पाचोरा पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीदास शंकर चौधरी (वय+-६५) रा. कृष्णापूरी, पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी कृष्णापुरी भागात आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी ते गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल संशयित आरोपी जसवंत सिसोदिया (वय-२८) रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश याने चोरून नेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून रविवारी ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक करती आहे.