जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील खडकी गावात उसनवारीच्या पैश्यांवरून प्रौढ व्यक्तीला काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरण जामनेर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी की, प्रकाश धनसिंग नाईक (वय-५५) रा. खडकी ता.जामनेर हे आपल्या परिवारासह राहायला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. शविवारी ४ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उसनवारीच्या पैशांवरून गावात राहणारा देवचंद बद्री नाईक याने अश्लिल शिवीगाळ करून काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसचे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर प्रकाश नाईक यांनी जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जामनेर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी देवचंद बद्री नाईक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंदा पाटील करीत आहे.